भाग २६ निखिल कुनी सोबत | कोळी आणि पाखोळ्यांचे भन्नाट जग by People of Nature Podcast published on 2024-11-15T13:58:53Z आज podcast वक्ते आहेत निखिल कुनी. निखिलने सोलापूर विद्यापीठातून प्राणीशास्त्रामध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. सध्या ते एम आय टी विश्वशांती विद्यापीठात PhD चा अभ्यास करत आहेत. निखिलने वाइल्डलाइफ इन्स्टिट्युट ऑफ इंडिया आणि झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया या प्रख्यात संस्थांबरोबर प्रोजेक्ट फेलो म्हणून काम केले आहे. त्यांच्या विविध प्रकल्पांमध्ये फुलपाखरे, पतंग, आणि कोळी यांचा अभ्यास केलेला आहे. राजस्थानातील थार वाळवंट तसेच ईशान्य भारतातील जंगलांमध्ये त्यांनी पतंगाच्या एका आणि कोळी वर्गातील पाच नवीन प्रजातींचा शोध लावला. यातील दोन कोळी प्रजातींना त्यांनी "माळढोक" आणि "सोलापूर" ही नावे देऊन महाराष्ट्रातील नैसर्गिक गवताळ भागांचे महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. Genre Learning