Stats for this track
| This Week | Total | |
|---|---|---|
| Plays | – | 278 |
| Comments | – | 1 |
| Downloads | – | 74 |
Uploaded by
अग्रतश्चतुरो वेदा: पृष्ठत: सशरं धनु:।
इदं ब्राम्हं इदं क्षात्रं शापादपि शरादपि॥
धरली आम्ही वेदमंत्र अन् गायत्रीची कास जरी
आधी जपले भारतीयत्व देशभक्तिची आस उरी
कोण्या एका राज्यामध्ये नावाला नव्हते ब्राम्हण
वाहून आल्या मृतांस केले परशुरामांनी चित्पावन
सोळाव्या शतकामधि भगवा दिल्लीमधि फडकवण्याचा
काळ तो शिवशाहीनंतर पेशवेपदी बसण्याचा
पेशवाईमधि शनिवारासह पावन पुण्यनगरी
इंग्रजांविरोधी फडक्यांनी स्वसमर्पिले संगरी
चापेकर अन कान्हेरेंनी रॅण्ड जॅक्सन वधला
गीतारहस्य टिळकांनी लिहिले विदांनी कमला
अमेरिकेला प्रथम डॉक्टरीण गेल्या आनंदीबाई
प्रथम रॅंगलर परांजपे तर सीए खरे सवाई
सिनेतंत्र अभ्यासून आला फाळकेकृत हरीश्चंद्र
तालसुरांतून बाबूजींच्या साकारे प्रभू रामचंद्र
ठेवू आम्ही मनी आमुच्या आदर्श ही मंडळी सारी
आधी जपले भारतीयत्व देशभक्तिची आस उरी
पूर्वजांनी लढा देऊनी स्वतंत्र केले भारतदेशा
युवापिढीने दाखवायची जगण्यासाठी नवी दिशा
भारतीय हे नाते जपूया माणुसकीच्या नात्याने
भारतीय हा मंत्र म्हणूया प्रत्येकाच्या मुखाने
तरूण आपण एकजूटीने देशाला या सावरूया
भारतीय हे जवान आपण प्रगतीपथावर जाऊया
विकसित करण्या देश आपुला सज्ज करूया युवापिढीला
गौरवशाली भारत अपुला ओळख व्हावी दुनियेला
चित्पावन तरूणांनी ही युक्ती शोधली नामी
खर्ची घालू युवापिढीची शक्ती या कामी
साद घालते मायभू आम्हां दिशादिशांतून दाही
कानमंत्र निर्धाराचा नसांनसातून वाही
या मातीच्या अभिमानाचा अश्वमेध आरंभियला
सज्ज जाहलो तिलक लेवूनी उदधृत तिजला करायला
सळसळत्या रक्ताने शिंपू मायमाऊली भारतभू
वसा सफळ संपूर्ण कराया आशिष दे आम्हांस प्रभू
हीच विनंती हेच मागणे मागतो तुझ्या दरबारी
आधी जपले भारतीयत्व देशभक्तिची आस उरी
Music - Sukhada Bhave
Lyrics - Kavita Chiplunkar, Sukhada Bhave and Smt Sushama Joshi
Singers - Rekha Mehendale, Rushikesh Abhyankar, Maanasi Athavle, Sailee Paranjape, Kedar Patwardhan
Recorded by - Parikshit Kulkarni (Prabha Digital Studio, Dombivli)
Produced by - Kobra Katta, Dombivli
- Shrikant Barve
Shrikant Barve on November 06, 2011 16:55
चाल छान आहे. फाईन टुनिग पाहीजे.
मह्त्वााचे र.घो. कर्वे व साने गुरूजीं याना वगळणे उचीत नाही. कृपा करून सामावून घ्यावे.

1 Comment
0 timed comments and 1 regular comment